भर दिवसा फडके रोडवरील क्लिनिकमध्ये चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भर दिवसा फडके रोडवरील क्लिनिकमध्ये चोरी
भर दिवसा फडके रोडवरील क्लिनिकमध्ये चोरी

भर दिवसा फडके रोडवरील क्लिनिकमध्ये चोरी

sakal_logo
By

भरदिवसा फडके रोडवरील क्लिनिकमध्ये चोरी
६६ हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबविली

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ४ ः डोंबिवलीतील वर्दळीच्या फडके रोडवरील एका दवाखान्यात घुसून चोरट्याने रिसेप्शन काऊंटरवरून तब्बल ६६ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (ता. ४) घडली. भरदुपारी ही चोरी झाली आणि कोणाच्या लक्षातही न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घर, दुकान यानंतर आता दवाखान्यांत चोरींचा सपाटा लावला असून कल्याण डोंबिवलीत दवाखान्यात चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील कृष्णा स्मृती इमारतीत अनिल कॅन्सर दवाखाना आहे. तक्रारदार किरण भांडारकर हे क्लिनिकमध्ये नोकरीस असून बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास क्लिनिकच्या रिसेप्शन काऊंटर येथील ड्राऍवर मध्ये ६६ हजाराची रोख रक्कम ठेवली होती. ही रक्कम तेथे नसल्याचे रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणाऱ्या दीपाली यांनी किरण यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी स्वतः पाहणी केली असता रक्कम मिळून आली नाही. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91603 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..