पीएसआय अरविंद वळवी यांचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएसआय अरविंद वळवी यांचा अपघातात मृत्यू
पीएसआय अरविंद वळवी यांचा अपघातात मृत्यू

पीएसआय अरविंद वळवी यांचा अपघातात मृत्यू

sakal_logo
By

पीएसआय अरविंद वळवी यांचा अपघातात मृत्यू

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलिस निरीक्षक अरविंद वळवी यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३) मध्यरात्री महापे येथील उड्डाणपुलावर घडली. या अपघातानंतर वळवी याना धडक देणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून तुर्भे एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेतील मृत सहायक पोलिस निरीक्षक अरविंद वळवी हे सध्या कल्याण येथील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी रात्री वळवी हे कामानिमित्त आपल्या मोटरसायकलवरून शिळफाटा महापेमार्गे नवी मुंबईत येत होते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास वळवी महापे येथील उड्डाणपुलावर आले असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात वळवी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. या अपघाताची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना धडक देणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिस दलात क्यूआरटी कमांडो म्हणून कार्यरत असताना वळवी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. वळवी हे नवी मुंबई पोलिस दलात रबाळे आणि खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वळवी यांच्या अपघाती निधनाने पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91604 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..