बूस्टर डोसमध्‍ये तीन पटीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बूस्टर डोसमध्‍ये तीन पटीने वाढ
बूस्टर डोसमध्‍ये तीन पटीने वाढ

बूस्टर डोसमध्‍ये तीन पटीने वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः गेल्या पंधरा दिवसांत बूस्टर डोस घेण्याच्या संख्येत जवळपास २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ ते १५ जुलै या कालावधीत फक्त सात टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, १ जुलै ते ५ जुलैदरम्यान १८ ते ५९ वर्षे आणि ६० वर्षांवरील ४८,६२४ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला होता जो १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान वाढून १ लाख ८९ हजार ५३० वर पोहोचला.
अधिकाऱ्यांनी या वाढीचे श्रेय केंद्राच्या आझादी का अमृतमहोत्सवासाठी ७५ दिवसांच्या मोफत लसीकरण मोहिमेला दिले आहे. याचा उद्देश सरकारी कोविड-१९ लसीकरण केंद्रावर प्रौढ (१८ वर्षे आणि त्यावरील) पात्र लोकसंख्येसाठी मोफत डोस देणे आहे. कोविड-१९ रुग्णांमध्ये झालेली घट आणि लसीकरणाचा फायदा तसेच भारत सरकारने हा डोस मोफत करून ९० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कालावधी कमी केल्याने लसीकरणाला चालना मिळाली आहे.
बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कार्यालये, मॉल्स आणि साप्ताहिक बाजारांव्यतिरिक्त गणेश मंडळे येथे लसीकरण मोहीम राबवत आहोत. शिवाय, सर्व जिल्ह्यांना जवळपास कालबाह्य होणाऱ्या सर्व लसींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या ज्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लसी कालबाह्य होणार नाहीत, असे राज्य आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोविडसारखी लक्षणे असलेल्या एच१एन१ सारख्या आजारांच्या भीतीने बूस्टर डोससाठी लोकांची गर्दी वाढली आहे. आता लोकांना लसीच्या दुष्परिणामांची भीतीदेखील नाही. कारण, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे माहिती दिली जाते. शिवाय, सरकारी रुग्णालयात ही लस मोफत दिली जाते. त्यामुळे नागरिक आता बूस्टर घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बूस्टर डोससाठी पुढे येणाऱ्या लाभार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, महाराष्ट्रातील सणासुदीचा विचार करता येत्या काही दिवसांत संख्या आणखी वाढेल, अशी आशा आहे.
– डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91609 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..