मुंबई : बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्‍ये तीनपट वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Booster dose
बूस्टर डोसमध्‍ये तीन पटीने वाढ

मुंबई : बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्‍ये तीनपट वाढ

मुंबई - गेल्या पंधरा दिवसांत बूस्टर डोस घेण्याच्या संख्येत जवळपास २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १ ते १५ जुलै या कालावधीत फक्त सात टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, १ जुलै ते ५ जुलैदरम्यान १८ ते ५९ वर्षे आणि ६० वर्षांवरील ४८,६२४ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला होता जो १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान वाढून १ लाख ८९ हजार ५३० वर पोहोचला.

अधिकाऱ्यांनी या वाढीचे श्रेय केंद्राच्या आझादी का अमृतमहोत्सवासाठी ७५ दिवसांच्या मोफत लसीकरण मोहिमेला दिले आहे. याचा उद्देश सरकारी कोविड-१९ लसीकरण केंद्रावर प्रौढ (१८ वर्षे आणि त्यावरील) पात्र लोकसंख्येसाठी मोफत डोस देणे आहे. कोविड-१९ रुग्णांमध्ये झालेली घट आणि लसीकरणाचा फायदा तसेच भारत सरकारने हा डोस मोफत करून ९० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कालावधी कमी केल्याने लसीकरणाला चालना मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91609 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..