भाईंदर-नायगाव खाडी पुला बाबत लवकरच तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाईंदर-नायगाव खाडी पुला बाबत लवकरच तोडगा
भाईंदर-नायगाव खाडी पुला बाबत लवकरच तोडगा

भाईंदर-नायगाव खाडी पुला बाबत लवकरच तोडगा

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : मुंबईला जाण्यासाठी डहाणूकरांना सध्या दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि दुसरा म्हणजे पश्चिम रेल्वेचा पर्याय; परंतु या दोन्ही मार्गावर गर्दीचा प्रचंड ताण असल्याने भाईंदर-नायगाव दरम्यानच्या खाडीवर नवा पूल उभारण्याची मागणी करण्यात येत होती. त्याबाबत निविदाही निघाली असून जागेअभावी हे काम रखडले आहे. यासाठी येत्या १५ दिवसांत तोडगा काढण्याबाबत महसूल, वन आणि सॉल्ट विभागाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेश अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंद राज यांनी दिले आहेत.

वसई तालुक्यातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत प्रस्तावित व प्रगतिपथावर असणाऱ्या प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी अति. महा. आयुक्त डॉ. के. एच. गोविंद राज यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे आयोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे मुंबई येथे करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने वसई तालुक्यातील प्रस्तावित व प्रगतिपथावर असलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नायगाव-भाईंदर खाडीवरील पूल, वसई विरार उपप्रदेशातील विरार (पूर्व पश्चिम) ते नायगाव (पूर्व पश्चिम) या रेल्वेला समांतर रस्ता विकसित करणे, विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर, दहिसर मिरा रोड माणिकपूर विरार मेट्रो आणि मिरा भाईंदर व वसई विरार शहरासाठी ४०३ एमएलडी पाणीपुरवठा योजना यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, पदाधिकारी व प्रमुख आधिकारी उपस्थित होते.

पुलासोबत मेट्रोचेही काम सुरू करण्याची मागणी
--------------------------
नायगाव भाईंदर खाडीवरील पुलाच्या कामाबरोबरच मेट्रोचे कामही सुरू करण्याची मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली होती. भाईंदर-उत्तन रोडवर असलेल्या सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ मेट्रोचे यार्ड होणार असून या ठिकाणी भाईंदर-नायगाव दरम्यानच्या मार्ग असल्याने मेट्रोसाठी सोयीचे होणार आहे. असे ठाकूर यांनी सांगितल्यावर आयुक्तांनी तांत्रिक बाजू तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91613 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..