कर्तृत्ववान व्यक्तींचा आज सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्तृत्ववान व्यक्तींचा आज सन्मान
कर्तृत्ववान व्यक्तींचा आज सन्मान

कर्तृत्ववान व्यक्तींचा आज सन्मान

sakal_logo
By

कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा आज सन्मान

ठाण्यात रंगणार दिमाखदार पुरस्कार सोहळा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : आयुष्याच्या कठीण वळणावरही आव्हानांवर यशस्वी मात करून समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ’तर्फे ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे शनिवारी (ता. ६) हा सोहळा रंगणार आहे. ‘एमसीएचआय’ ठाणे हे या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर आहेत.
विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, मुंबईतील सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या प्रमुख, प्राध्यापिका डॉ. रागिणी पारेख, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती देशपांडे आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रांत यशाच्या शिखरावर पोहोचलेली अनेक व्यक्तिमत्त्‍वे अनेकदा समाजासमोर येत नाहीत. स्वत:च्या क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवल्यानंतर अशा व्यक्तींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यशाचे शिखर गाठताना त्यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीही अनुभवली आहे. ‘सकाळ’ने अशा कार्यकुशल, यशस्वी व्यक्तिमत्त्वांची ओळख ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने करून दिली आहे. अशा स्वतःच्या क्षमता, ज्ञान, शिक्षण तसेच नैतिक मूल्यांचे पालन करून समाजाला समृद्ध करणाऱ्या मान्यवरांचा गौरव ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार आहे. फूड आणि रेस्टॉरंट्स तसेच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामगिरीची मोहोर उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे. ठाण्यात होणारा हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91619 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top