ठाण्यातील सेवा रस्त्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील सेवा रस्त्यांची दुरवस्था
ठाण्यातील सेवा रस्त्यांची दुरवस्था

ठाण्यातील सेवा रस्त्यांची दुरवस्था

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : ठाणे महापालिका हद्दीतील मुख्य रस्त्यांना जोडरस्ता उपलब्ध व्हावा, तसेच लहान वाहनांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सेवा रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावर करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे व पावसाळ्याच्या काळात होत असलेल्या दुरवस्थेमुळे सेवा रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पालिका हद्दीत आनंदनगर ते गायमुख असा दोन्ही बाजूने ३२ किमीचा सेवा रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात यावा, अशी मागणी ठाणेकरांकडून करण्यात येत आहे.
घोडबंदर भागात मुख्य महामार्गाला जोडरस्ते म्हणून सोबत लहान वाहनांना रस्त्यांचा पर्याय मिळावा, या उद्देशाने सेवा रस्ते तयार करण्यात आले. त्यानुसार दोन्ही बाजूंचा मिळून ३२ किमीचा सेवा रस्ता आहे. सध्या यातील आनंद नगर ते माजिवडा या चांगल्या स्वरूपातील रस्ता असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम वारंवार होताना दिसत नाही; परंतु कापूरबावडी ते गायमुख या भागातील सेवा रस्त्यांवर ब्रह्मांड नाक्यापासून पुढे उजव्या बाजूकडील सेवा रस्त्याची अवस्था वारंवार खोदकाम करण्यात येत असल्याने बिकट झाली आहे. त्यात पावसाळ्यात या रस्त्यांची चाळण झाल्याचेच दिसत आहे. त्यामुळे घोडबंदरच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्यास छोट्या वाहनचालकांनादेखील या सेवा रस्त्यांचा वापर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यानुसार रस्ते चांगल्या स्थितीत राहावे, अशी नागरिकांकडूनदेखील मागणी करण्यात येत आहे.

काँक्रीटीकरणाची मागणी
..............
रस्ते काँक्रीटचे केल्यास त्यांचा दर्जा चांगला राहून वारंवार खड्डे पडण्याचे प्रमाणही यामुळे कमी होणार आहे. त्यानुसार पालिकादेखील त्याचा विचार करीत असल्याचे दिसत आहे. पातलीपाडा येथील उजव्या बाजूकडील एका पॅचवर पालिकेने काँक्रीटीकरणाचा प्रयोगदेखील केला आहे. तो यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीदेखील हा पर्याय उपयोग आणण्याचा विचार केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91627 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..