उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ७) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
-----
मध्य रेल्वे-
कुठे- माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप -डाऊन जलद मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम-
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील; तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
----
हार्बर रेल्वे-
कुठे - पनवेल-वाशी स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम-
या ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी विभागामध्ये विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ-खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.


----
पश्चिम रेल्वे-
कुठे- वसई यार्ड ते दिवा अप-डाऊन धीम्या मार्गावर
कधी- रात्री १२.१५ ते मध्य रात्री ३.१५ वाजेपर्यंत

परिणाम- या ब्लॉकदरम्यान वसई रोड यार्डच्या अप-डाऊन दिवा मार्गावर तीन तासांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेतला आहे. वसई यार्ड येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91640 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top