भिवंडीत २२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत २२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल
भिवंडीत २२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडीत २२ चोरीच्या गुन्ह्यांची उकल

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : ठाणे व भिवंडी शहर परिसरातून रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहने चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शांतीनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून बारा लाखाच्या मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून विविध २२ गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली.
भिवंडी शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, एसीपी प्रशांत ढोले यांनी पोलिस अधिकाऱ्यांची याविषयी बैठक घेऊन चोरीच्या या घटनांना पायबंद घालून गुन्हे उकल करण्याचे आदेश दिले व शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक निर्माण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अजयकुमार दशरथ वर्मा, मो. सरजिल ऊर्फ हमजा सिराज अ. मोमीन, वाहिद हुसेन शेख, जहुर मो. हसन शेख, सादिक जुबेर खान या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध पोलिस ठाण्यातील २२ गुन्ह्यांतील एकूण १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91643 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..