पान ३ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ पट्टा
पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

sakal_logo
By

कोपरखैरणेत महारक्तदान शिबिर
कोपरखैरणे (बातमीदार) ः रा. फ. नाईक विद्यालय व एफ. जी. नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३२५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तसेच माजी नगरसेवक केशव म्हात्रे यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षा अभ्यासाची पुस्तके भेट दिली. याप्रसंगी श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव दिवंगत सुरेश नाईक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त झालेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
मनसे जिल्हा कार्यकारिणीची बैठक
उरण (वार्ताहर) ः महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुशंगाने जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण खोपटा येथे मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठक घेतली. या वेळी गाव पातळीवरील व शहर पातळीवरील जनमानसांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना करण्यात आल्या.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत मार्गदर्शन
पनवेल (बातमीदार) : खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांना ‘घरोघरी तिरंगा’ जनजागृती अभियानात सामील करून घेण्यात आले. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. झेंडा फडकविण्याबाबतचे निर्देश, सूचना सांगितल्या तसेच अभियान यशस्वी करण्यासाठी शुभेच्या दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत पनवेल महानगरपालिका हे जनजागृती अभियान राबवित आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
रायगड काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रा
उरण (वार्ताहर) ः स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यभर आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे रायगड जिल्ह्याध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार असून काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, नागरिकांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उलवे येथील पत्रकार परिषदेत केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम करण्यात येणार आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
सरस्वती महाविद्यालयात विशेष कार्यशाळा
खारघर (बातमीदार) : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉ. राम भिसे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक काळामध्ये जर प्रगती करायचे असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन केले. तर देब्राज मौलिक यांनी कंपनी किंवा संस्थेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी जाताना मुलाखतीसाठीचे मार्गदर्शन केले. तर अनघा मुळे यांनी संस्कृती टिकविण्यासाठी नैतिक मूल्य जोपासणे गरजचे असल्याचे सांगितले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
नेरूळ परिसरामध्ये धूर, औषध फवारणी
नेरूळ (बातमीदार)ः डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नवी मुंबईत साथीचे आजार बळावले आहेत. याच अनुंशगाने नेरूळ सेक्टर १० मधील काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा कमिटी उपाध्यक्ष महेश बनगे यांनी आयुक्तांकडे धूर व औषध फवारणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने एलआयसी तसेच आजूबाजूच्या सर्व सोसायटींमध्ये घरोघरी जावून औषध फवारणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91667 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..