तिरंगा अभियानासाठी कोकण विभाग सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगा अभियानासाठी कोकण विभाग सज्ज
तिरंगा अभियानासाठी कोकण विभाग सज्ज

तिरंगा अभियानासाठी कोकण विभाग सज्ज

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान कोकण विभागातील घरे, सरकारी, खासगी आस्थापना, तसेच ग्रामीण भागात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी ३० लाख ५९ हजार ५०२ ध्वज उपलब्ध करण्यात आले असून केंद्र शासनाकडे ८ लाख ७९ हजार ४४४ ध्वजांची वाढीव मागणी करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे.
देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होत असल्याने केंद्र सरकारने वीर जवानांची आठवण आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तिरंग्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचावे म्हणून घरोघरी तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोकण विभागामार्फत जिल्हा, तालुका, शहर, महापालिका, पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिह्यांतील एकूण २९९० ग्रामपंचायतींत २६५० ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत; तर ३४० ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून या अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच उपक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रत्येक सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवा मंडळे, लोक प्रतिनिधी यांचा सहभाग व सहकार्य घेण्यात येणार आहे. यामध्ये पोस्टर्स व बॅनर्स लावणे, शाळांमधून मुलांच्या स्पर्धा घेणे, प्रभात फेऱ्या या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
-----------------------------------------
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवून साजरा होतो आहे. या महोत्सवाचा भाग म्हणून कोकण विभागात घरोघरी तिरंगा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यत येणार आहे. यासाठी लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम केले जात आहेत.
- महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91680 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..