स्वातंत्र्यदिनी खादीला बाजारात मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यदिनी खादीला बाजारात मान
स्वातंत्र्यदिनी खादीला बाजारात मान

स्वातंत्र्यदिनी खादीला बाजारात मान

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) ः स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतील सिग्नल, एपीएमसी मार्केट, पालिकेच्या आठही नोडमधील दुकांनामध्ये झेंडे, टी शर्ट, दुपट्टा, कुर्ती, खादीचे कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा खादीचे कपडे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे.
शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, शाळा, महाविद्याालये, काही निवडक आस्थापनांनाच राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी होती. मात्र मागील दहा वर्षांपासून कोणत्याही नागरिकांस राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी दिल्यानंतर तिरंग्याच्या विक्रीत वाढ झाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शाळा, महाविद्याालये बंद असल्याचा फटका विक्रेत्यांना बसला होता. यंदा मात्र स्वातंत्र्यदिन निर्बंधमुक्त असल्यामुळे तिरंग्याबरोबरच खादीचे कपडे, वुलनचे जॅकटे, खादीची टोपी यांना मागणी वाढली आहे.

चौकट
कोरोनामुळे स्वातंत्र्यदिनासाठी लागणाऱ्या कपड्यांची मागणी घटली होती. यंदा मात्र हर घर तिरंगा योजनेमुळे तिरंग्याची मागणी वाढली आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणात टी शर्ट, कुर्ती; तर मुली तिरंग्याच्या कलरचा दुपट्टा खरेदी करत आहे.
- हरिष पांडे, विक्रेते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91688 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..