प्रभाग रचना बदलाने आजवरचा खर्च, प्रशासकीय श्रम पाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचना बदलाने आजवरचा खर्च, प्रशासकीय श्रम पाण्यात
प्रभाग रचना बदलाने आजवरचा खर्च, प्रशासकीय श्रम पाण्यात

प्रभाग रचना बदलाने आजवरचा खर्च, प्रशासकीय श्रम पाण्यात

sakal_logo
By

प्रभाग रचनेवरून कलगीतुरा
महाविकास आघाडी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
वाशी, ता.६ (बातमीदार) ः राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी पूर्वीची प्रभागरचना रद्द केली जाणार असून पुन्हा नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. या निर्णयामुळे एक सदस्य पद्धत व नंतर तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या प्रक्रियेसाठी झालेला खर्च, प्रशासकीय श्रम पाण्यात जाणार आहेत; तर निवडणुका पुढे ढकलून इतर पक्षांतील मंडळींना आपल्याकडे वळविण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे, तर दुसरीकडे भाजपने आधीची प्रभाग रचना सदोष असल्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचा दावा केल्याने महापालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार सर्व प्रक्रिया पूर्णत्वास गेली असताना मंत्रिमंडळाच्या निर्णयाने ती पुन्हा नव्याने राबविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर या निर्णयाचे पडसाद उमटत आहेत. महापालिकेत सदस्य संख्या सुधारण्याचा निर्णय म्हणजे निवडणूक पुढे ढकलण्याचे षडयंत्र
असल्याचा आरोप नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे भाजपने समर्थन केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविलेली प्रक्रिया सदोष असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी म्हटले आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. एका प्रभागातील शेकडो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकली गेल्याने नव्या निर्णयामुळे सदस्य संख्येत सुधारणा होईल, असा दावा घरत यांनी केला आहे; तर या निवडणुका लांबणीवर पडल्याने सामान्य नागरिक भरडला जाणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
शहरातील लोकसंख्येत १० टक्के वाढ गृहीत धरून महापालिकेच्या आगामी निवडणुकीत १२२ जागा होत्या. आता सदस्य संख्येत बदल झाल्यास सात जणांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेची प्रक्रिया, प्रभागनिहाय मतदारसंख्या यावर हरकती आणि सूचना मागवून निवडणूक आयोगाने या बाबी अंतिम केल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने आधी कार्यक्रम कायम ठेवून निवडणूक जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त नमुंमपा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91690 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..