मुख्याध्यापिका सुशीला पाटील सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्याध्यापिका सुशीला पाटील सेवानिवृत्त
मुख्याध्यापिका सुशीला पाटील सेवानिवृत्त

मुख्याध्यापिका सुशीला पाटील सेवानिवृत्त

sakal_logo
By

जोगेश्‍वरी, ता. ६ (बातमीदार) ः रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरीच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुशिला पाटील ३५ वर्षांचा सेवा काळ यशस्वीपणे पूर्ण करून नुकत्‍याच निवृत्त झाल्या. आपल्या मुख्याध्यापिका पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले. पालकांसाठी वाचनालय सुरू करून त्यातून आदर्श पालक वाचक निवडून त्यांना सन्मानित केले. कोरोना काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्या पालकांनी आपल्या मुलांचे शिक्षण सुरळीत चालू ठेवले, अशा महिला पालकांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली. मराठी भाषा दिवस, शिवजयंती, संविधान दिवस, विद्यार्थी गुणगौरव अशा अनेक कार्यक्रमांचे सुशिला पाटील चांगले नियोजन करीत असत. त्यांना शाळेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले होते. अशा या उपक्रमशील मुख्याध्यापिकेचा निरोप समारंभ संस्थेचे उपकार्याध्यक्ष जनार्दन विश्वासराव, संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे चेअरमन सहदेव सावंत, खजिनदार मंगेश पंडित, चिटणीस सुरक्षा घोसाळकर, यशवंत साटम यांच्या उपस्थितीत झाला. संस्थेच्या वतीने साडी, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91697 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top