कोरोनातील अनाथ मुलांना मनपाचा आधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनातील अनाथ मुलांना मनपाचा आधार!
कोरोनातील अनाथ मुलांना मनपाचा आधार!

कोरोनातील अनाथ मुलांना मनपाचा आधार!

sakal_logo
By

अनाथ मुलांवर पालिकेचे छत्र
कोरोनाकाळात पालक गमावलेल्यांना आधार; पावणे दोनशे मुलांना मदत
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल ः कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अनाथ पालकांच्या पाल्यांना पनवेल महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. त्यांना काहीसा आर्थिक हातभार आणि आधार मिळावा या हेतूने जवळपास पावणे दोनशे मुलांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये डिपॉझिट करण्यात आले आहेत. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने हा निर्णय घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोना या जागतिक महामारीत अनेक घरांमधील कर्ते पुरुष, त्याचबरोबर महिलांचा मृत्यू झाला. विशेषकरून दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले. पनवेल महापालिका क्षेत्रातसुद्धा हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित झाले. अनेक घरांमधील कमावत्या व्यक्तींवर कोरोनाने घाला घातला. त्यामुळे शेकडो मुला-मुलींवर आर्थिक संकट ओढवले आहे; तर काही कुटुंबातील आई-वडील दोघेही मरण पावल्याने निराधार झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडलेल्या या मुलांसमोर शालेय शुल्क भरायचे कसे, असा प्रश्न उभा आहे. अशा मुलांचे पालकत्व पनवेल महापालिकेने घेतले असून आर्थिकदृष्ट्या आधार देण्यासाठी प्रत्येकी ५० हजारांची मदत केली आहे.

८७ लाखांचे वाटप
कोरोनामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील शेकडो पाल्य पोरकी झाली आहेत. अशा मुला-मुलींना अर्थसाह्य करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. त्यानुसार १७५ मुला-मुलींना प्रत्येकी पन्नास हजारांची मुदत ठेवीचे अर्थसाह्य दिले आहे. यासाठी ८७ लाखांचे वाटप करण्यात आले. ही मुदत ठेव एक वर्षाची असून संबंधित मुलांचा शैक्षणिक खर्च यातून केला जाणार आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात अग्रेसर
पनवेल महापालिकेने कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत. आरोग्यविषयक सर्वेक्षणाबरोबरच कोविड चाचण्यांपासून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावे, यासाठी कामोठे एमजीएम आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलबरोबर करार केला. उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांना उपचार दिले आहेत.

कोट
कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अनाथ पालकांच्या पाल्यांना पनवेल महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. आर्थिक हातभार आणि आधार मिळावा, या हेतूने पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात आली आहे.
- प्रकाश गायकवाड, पनवेल महापालिका, विभाग प्रमुख, महिला व बालकल्याण समिती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91706 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top