हे बंध रेशमाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हे बंध रेशमाचे
हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे

sakal_logo
By

ऑगस्‍ट म्‍हटला की चाहूल लागते ती सणासुदींची. तरुणाईला साद घालणारे फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन या दोन्‍ही सणांचा थाटमाटच वेगळा. मैत्री आणि भावा-बहिणीच्‍या नात्‍याला अलगदपणे रेशमी बंधनात बांधून ठेवणाऱ्या या सणांना तरुणाईचा अमाप उत्‍साह पाहायला मिळतो. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर निर्बंध आले होते. मात्र, यंदा तब्‍बल दोन वर्षांनंतर हे दोन्‍ही सण अमाप उत्‍साहात साजरे होणार आहेत. यासाठी बाजारपेठा सज्‍ज झाल्‍या असून, या रेशमी बंधासाठी तरुणाईची उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे.

जगभरात फ्रेंडशिप डे हे वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जातात. भारतात ऑगस्ट महिन्याच्‍या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी लोक मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देऊन प्रेमभाव व्यक्त करतात.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ठाण्याच्या बाजारात वेगवेगळ्या भेटवस्तू, तसेच फ्रेंडशिप बँड, फ्रेंडशिप रिंगस, हॅप्पी फ्रेंड्स फोरेवर लिहिलेले रिबिन्‍स, ग्रीटिंग कार्ड्स, कॉफी मगस् विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

जाड पट्टा असलेला आणि त्यावर वेगवेगळ्या रंगात, तसेच विशिष्ट रेषा असणाऱ्या व मध्यभागी फ्रेंड्स असा लिहिलेल्या बँडला सध्या तरुणांकडून जास्त पसंती मिळताना दिसत आहे. त्यांची किंमत ही ८० ते १०० रुपयांच्या घरात आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे रिंग, सिल्क रिबिन्‍स आणि बँडवर फ्रेंड लिहिलेले असून ते वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत दहा ते ५० रुपयांपर्यंत आहे. हॅप्पी फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा लिहिलेले कॉफी मगही उपलब्‍ध आहेत. त्यांच्या किमती १५० ते ५०० या दरात आहेत. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ठाण्यात काही कॅफेमध्ये विशेष सूट देण्यात येणार असल्याचे कॅफे धारकांनी सांगितले आहे. तसेच कॅफेजमध्ये सजावटदेखील करण्यात येणार आहे.

आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी तलावपाळीच्या येथे फ्रेंडशिप डे साजरा करतो. एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून फ्रेंडशिप डे साजरा करतो. एकमेकांना भेटवस्तू देतो.
- श्रद्धा सातपुते

फ्रेंडशिप डे साठी दरवर्षी बाजारात नवनवीन गोष्टी येत असतात. यावेळी जाड पट्ट्यांच्या विशिष्ट रेषा असणाऱ्या व मध्यभागी फ्रेंड्स असा लिहिलेल्या बँडला सर्वाधिक पसंती आहे.
- सतीश चौधरी, विक्रेता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91708 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..