कोंडीच्या धबधव्यावर गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडीच्या धबधव्यावर गर्दी
कोंडीच्या धबधव्यावर गर्दी

कोंडीच्या धबधव्यावर गर्दी

sakal_logo
By

प्रमोद जाधव, अलिबाग
बेलोशी परिसरातील सागवाडी येथील डोंगर भागात असलेल्या कोंडीचा धबधबा पर्यटकांनी फुलू लागला आहे. येथील दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्‍याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
अलिबाग तालुक्‍याला पर्यटनाच्या दृष्‍टीने विशेष महत्त्व आहे. येथील समुद्रकिनारे, गड-किल्ले पर्यटकांच्या पसंतीस उतरले असताना पावसाळ्‍‌यात सुरू होणारे धबधबेही पर्यटकांना भुरळ घालतात. शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोशी गावात सागवाडी या डोंगराळ भागात कोंडीचा धबधबा आहे. या धबधब्‍यावर पर्यटनासाठी येणाऱ्‍‌यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वीकेण्ड तसेच सुटीच्या दिवशी परिसर गजबजतो.
कोंडीचा धबधबा या ठिकाणी स्थानिकांसह मुंबई, अलिबाग, रोहा व इतर भागांतून पर्यटक मौज-मजा करण्यासाठी येतात. धबधब्‍यात भिजण्याबरोबरच याठिकाणी मोठ-मोठ्या दगडांवर काढण्यात आलेल्‍या चित्रांसह सेल्फी काढण्याचा मोह प्रत्‍येकालाच होतो. एका चित्रकाराने येथील दगडांवर वाघ व अन्य प्राण्यांचे चित्र रंगवले आहे. त्यामुळे जणूकाही प्रत्यक्षात पाणवठ्याजवळ वन्यप्राणी असल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी हा धबधबा आकर्षण ठरत असून परिसरात सुविधा उपलब्ध केल्यास या भागाला पर्यटन वाढीच्या दृष्टीने चालना मिळेल.

कोंडीचा धबधबा हे निसर्गाचे देणे आहे. या ठिकाणी पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे बेलोशी - सागवाडीचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढू लागले आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून सुविधा निर्माण कराव्यात.
- श्रीधर भोपी, माजी सदस्य,
पंचायत समिती अलिबाग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91721 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..