सॅटीस प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅटीस प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा
सॅटीस प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

सॅटीस प्रकल्पाचे अर्धे काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः ठाणे पूर्वेतील सॅटीस प्रकल्पाचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यातील मंगला हायस्कूलजवळील भाग वळणाचा व कमी असल्याने त्या ठिकाणी स्टिल स्वरूपातील रेडिमेड गर्डर टाकले जाणार आहे. यामुळे या पुलाचा काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा पालिकेने केला आहे.

सॅटीस प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ५४ टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत. शिवाय बससाठी ७ हजार स्क्वेअर मीटरचा टर्मिनलही उभारला जाणार आहे. पूर्वेकडील बाजूस ११ हजार १०० चौरस मीटर जागा असून त्यापैकी १० हजार चौ. मी. जागा रेल्वेची आहे. ११०० चौ. मी. जागेवर रस्ता आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून फ्लायओव्हर केला जाणार आहे. तसेच या योजनेमध्ये नवीन कोपरी पुलाच्या बाजूस नव्याने आर.ओ.बी. बांधून रेल्वेस्थानकापर्यंत किमान ५.५० मी. उंचीवर तीन मार्गिकांचा एलिव्हिटेड रोड बांधण्यात येईल. तो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत प्रस्तावित वाणिज्यिक विकासाखालील डेकला जोडण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान गर्डरची पाहणी दमण येथे जाऊन केली आहे. त्यानुसार येथील गर्डर लॉन्च झाल्यानंतर याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर या सॅटीसचे काम पूर्ण करून तो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91737 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top