बदलापुरातील शिवसैनिकांची ठाकरेंशी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरातील शिवसैनिकांची ठाकरेंशी भेट
बदलापुरातील शिवसैनिकांची ठाकरेंशी भेट

बदलापुरातील शिवसैनिकांची ठाकरेंशी भेट

sakal_logo
By

बदलापूर, ता. ६ ः बदलापूर येथील शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात ठाकरे गटाचे अस्तित्व संपेल, असे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ६) बदलापूर शहरातील शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वय समितीवरील सदस्य अतुल राणे, उप शहरप्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, शशिकांत पातकर यांच्यासह जवळपास १०० कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. बंडखोरी केलेल्या गटातील लोकांशी वाद न घालता फक्त समाजसेवेचे व्रत स्वीकारून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलापूर शहरात पुन्हा नव्याने शिवसेना उभारून काम करण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे बदलापूर शहरात शिवसेना संपली नाही. आता नव्याने पक्ष नेतृत्वाची निवड होऊन त्याच जोमाने शहरात काम करणार असल्याचे अतुल राणे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91765 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..