डाक विभागाच्या योजनेबाबत शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाक विभागाच्या योजनेबाबत शिबिर
डाक विभागाच्या योजनेबाबत शिबिर

डाक विभागाच्या योजनेबाबत शिबिर

sakal_logo
By

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : भारतीय डाक विभागाच्या अनेक लाभदायी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. या सर्व योजना पोहोचाव्यात आणि गरजूंना लाभ मिळावा, यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते; तसेच नेरूळ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी भारतीय डाक विभागाचे लाभदायी योजनेचे शिबिर राबवले.
१८ ते ६५ वयोगटातील नागरिकांसाठी ३९९ रुपये वार्षिक हप्ता भरून दहा लाख रुपयांचा अपघाती विमा असलेली ही योजना आहे. ही योजना शिबिरामध्ये अनेक नागरिकांना समजावून सांगण्यात आली. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. या योजनेनुसार अपघाती मृत्यू दहा लाख रुपये, कायमचे अपंगत्व दहा लाख रुपये, दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये, मुलांच्या शिक्षणाचा खर्च एक लाखापर्यंत, ॲडमिट असेपर्यंत दररोज एक हजार रुपये, ओपीडीचा खर्च ३० हजार रुपये, अपघाताने पॅरालिसीस झाल्यावर दहा लाख रुपये, कुटुंबाला दवाखान्याचा प्रवास खर्च २५ हजार रुपये असा लाभ या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. ही योजना अत्यंत लाभदायी असून, अन्य नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवींद्र सावंत यांनी केले आहे.


सर्वसामान्यांपर्यंत या योजना पोहोचाव्या आणि सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. याकरिता रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून शिबिर राबवत आहोत.
- विद्या भांडेकर, काँग्रेस जिल्हा सचिव

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91772 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..