भंडारा सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी नीलम गोऱ्हे यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी नीलम गोऱ्हे यांची मागणी
भंडारा सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी नीलम गोऱ्हे यांची मागणी

भंडारा सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी नीलम गोऱ्हे यांची मागणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भंडारा जिल्ह्यात माहेरी जाणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेवर घरगुती वादातून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित महिला या अत्याचारामुळे जखमी झाली आहे. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणासारखी ही घटना असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर पोलिस, इतर न्याय यंत्रणा उदाहरणार्थ, मनोधैर्य योजनेबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे पोलिस महानिरीक्षक यांना फोनवरून संपर्क करून दिल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली. त्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडे प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. न्याय मिळण्याकरिता आम्ही सर्वपरीने कायदेशीर मदत करू अशी ग्वाही दिली.

शक्ती कायदा अमलात आणावा
--------------
मागील मार्च महिन्यात राज्य सरकारने एकमताने शक्ती कायदा पारित केले. केंद्र सरकारकडे हे विधेयक प्रलंबित आहे. शक्ती कायदा लवकरात-लवकर आला तर न्याय मिळेल. यामुळे अशा अपप्रवृत्तीला आळा बसेल. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये हा कायदा पारित झाला म्हणून त्याकडे पक्षीय राजकारणातून बघू नये, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91785 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top