बदलापूरातील प्रसिद्ध हेमाडपंथी कोंडेश्वर देवस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूरातील प्रसिद्ध हेमाडपंथी कोंडेश्वर देवस्थान
बदलापूरातील प्रसिद्ध हेमाडपंथी कोंडेश्वर देवस्थान

बदलापूरातील प्रसिद्ध हेमाडपंथी कोंडेश्वर देवस्थान

sakal_logo
By

बदलापूरमधील कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. बदलापूर रेल्वेस्थानकावरून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले हे शंकराचे प्राचीन देवालय आहे. कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले हेमाडपंथी शैलीतील वास्तूंचे प्रतिनिधित्व करते. हे मंदिर मुख्य म्हणजे काळ्या दगडांनी बनवले गेले आहे. मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवळे आहेत. महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. तसेच श्रावणात तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या परिसरात श्री खतेश्वर महाराज समाधी, एक तलाव आणि धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. श्रावणात सोमवार, शनिवार व पूर्ण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत इथे धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.
मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रशस्त असून, मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या लिंगाचे दर्शन घेत बाहेरील भागात अनेक देव-देवतांच्या मूर्ती दर्शनासाठी आहेत. मंदिराचा गाभारा हा अगदी अरुंद आणि अंधारमय असला तरी गाभाऱ्यात गेल्यानंतर प्रसन्न आणि शांत वाटते. या मंदिर परिसरात श्रावणात अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. तसेच वर्षभरात मंदिर समितीकडून विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणचे पावित्र्य जपले जावे यासाठी देखील मंदिर प्रशासन काम करत असते.
मंदिराच्या अगदी पाठीमागे येथील मुख्य मंदिराच्या सभोवताली छोटी-छोटी मंदिरे आहेत, जी पाण्याखाली गेली आहेत. याठिकाणी एक प्रवरकुंड आहे, ज्याची खोली खूप आहे. या ठिकाणी प्रवेशास मज्जाव आहे. आता पोलिस प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेट्‍स टाकून हा भाग बंद केला आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी पोलिस तैनात असतात.
कोंडेश्वर हे बदलापूर शहराची एक वेगळी ओळख आहे. वर्षभर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91797 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..