विद्यार्थ्यांचा अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्यदिन गणवेशाविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्यदिन गणवेशाविना
विद्यार्थ्यांचा अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्यदिन गणवेशाविना

विद्यार्थ्यांचा अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्यदिन गणवेशाविना

sakal_logo
By

खर्डी, ता. ७ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील आधीच घरघर लागलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या अडचणीत नवी भर पडली आहे. शालेय विद्यार्थ्यांना अद्यापही मोफत योजनेतील गणवेश उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे आदिवासी गोरगरीब विद्यार्थी फाटक्या कपड्यांनिशी शाळेत येत असून, सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या निर्णयामुळे पालक वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे. अमृतमहोत्‍सवी स्वातंत्र्यदिनी शहापूर तालुक्यातील निम्‍म्‍यापेक्षा अधिक विद्यार्थी गणवेशाविना शाळेत उपस्थित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्‍या आठवडाभरात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावेत, अशी मागणी पालक वर्ग करीत आहेत.
शहापूर तालुक्यातील ४५७ जिल्हा परिषदेच्या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत २१ हजारांच्या आसपास विद्यार्थी आहेत. दरवर्षी सरकारकडून सर्व विद्यार्थिनींना व एससी, एसटी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. सरकारकडून मे २०२२ ला तालुक्यातील सर्वच शाळांत अनुदान देण्यात आले. मात्र कार्यालयीन कामामधून वेळ मिळत नाही, तीनशे रुपयांत गणवेश येत नाही, दोन वर्षांपासून बाजारपेठ बंद असल्याने कापड मिळत नाही व पावसात गणवेश खराब होतात यांसारखी कारणे देऊन काही शिक्षक सरकारच्या उद्देशालाच हरताळ फासत असल्याचा आरोप आदिवासी संघटना करीत आहेत. काही आदिवासी गोरगरीब विद्यार्थी फाटके कपडे घालून येत असल्याने त्यांची वर्गात चेष्‍टा केली जात आहे. त्यामुळे असे विद्यार्थी शाळेत येण्यास टाळाटाळ करीत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

सरकारकडून कोट्यवधींचा निधी
एकीकडे सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार सर्व शिक्षा अभियान राबवित असून आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; परंतु तालुक्यातील अतिदुर्गम भागात हातावर पोट असणारी आदिवासी जनता आपल्‍या पाल्‍यांसाठी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहे.
---------------------------------------------------------------
गणवेश वाटपाबाबत येत्या दोन दिवसांत सर्व मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेऊन, तांत्रिक अडचणीमुळे गणवेश वाटप न करणाऱ्या शाळांना सर्व विद्यार्थ्यांसाठी १५ ऑगस्टपूर्वी गणवेश वाटप करण्याचे आदेश देण्यात येतील.
- बी. टी. चव्हाण,
गटशिक्षण अधिकारी, शहापूर.
--------------------------------------------------–----------
सरकारकडून फक्त राखीव मुले व सर्व मुली यांना गणवेश अनुदान प्राप्त झाले असून, गणवेश वाटप सुरू आहे. इतर प्रवर्गातील मुलांना जिल्‍हा परिषदेकडून गणवेशासाठी अनुदान प्राप्त झाल्यावर लवकरच गणवेश वाटप करण्यात येतील.
- सुधीर भोईर,
अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, खर्डी-१
---------------------------------------------------------------
शाळा विद्यार्थ्यांना गणवेश देणार असल्याने आम्ही गणवेश घेतले नाहीत, पण १५ ऑगस्ट जवळ येत असून आता गणवेशाची प्रतीक्षा आहे.
- निखिल बेडकुळे, पालक.
खर्डी : जिल्‍हा परिषद शाळेतील रंगीबेरंगी कपडे घातलेले विद्यार्थी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91798 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..