सीएनजीच्या दरवाढीने रिक्षाचालक हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएनजीच्या दरवाढीने रिक्षाचालक हवालदिल
सीएनजीच्या दरवाढीने रिक्षाचालक हवालदिल

सीएनजीच्या दरवाढीने रिक्षाचालक हवालदिल

sakal_logo
By

सीएनजी दरवाढीची रिक्षाचालकांना झळ
प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ; व्यवसायावर परिणाम
वाशी, ता. ७ (बातमीदार) ः सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे दर ८६ रुपयांवर गेल्याने या दरवाढीचा परिणाम रिक्षाचालकांच्या व्यवसायावर झाला आहे.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही वर्षांत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यातेलापासून पेट्रोल, डिझेल सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. यात आता सीएनजीच्या दरांमध्ये झालेल्या वाढीने भर घातली आहे. हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांना सीएनजी दरवाढीची झळ बसली आहे. कारण जेवढा दिवसभरात व्यवसाय होतो, त्यातील नफा हा खर्चात जात असल्यामुळे पदरी काहीच पडत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. अशातच सध्या खुला परवाना झाल्यामुळे व्यवसायात वाढलेल्या स्पर्धेमुळेदेखील व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच सीएनजीच्या दरवाढीने जगायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

पुन्हा भाडेवाढीची शक्यता
गेल्या वर्षभरात अनेकदा सीएनजी दरात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत भाडेवाढ झाली नसल्याने त्याचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
---------------------------
सीएनजीच्या दरात वर्षभरामध्ये ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. या दर वाढीने रिक्षाचालकांचे बजेट कोलमडले आहे. दिवसभराच्या व्यवसायातील अर्धे पैसे इंधनासाठीच खर्च होत आहेत. पूर्वी सीएनजीची रिक्षा परवडत होती. मात्र आता सीएनजीची रिक्षा परवडत नाही.
- दिलीप आमले, अध्यक्ष, शिववाहतूक सेना
------------------------------------
खुले परमिट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वी सहा तास काम केल्यानंतर जेवढा व्यवसाय होत होता, तो आता बारा तास काम केल्यांनतर होत नाही. त्यामुळे इंधनाचा खर्च वजा केल्यांनतर फक्त तीनशे ते चारशे रुपये मिळत आहेत. त्यामुळे चारशे रुपयांत कसे जगायचे, असा प्रश्न पडतो.
- दत्तात्रय भिलारे, रिक्षाचालक
---------------------------------
काही दिवसांपूर्वी महिलांसाठी रिक्षांचे परमिट मिळत असल्यामुळे अबोली रिक्षा विकत घेतली, पण सध्या रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात पुरुष रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे महिला रिक्षाचालकांना व्यवसाय करणेही कठीण आहे.
- सुमन मध्यवाड, महिला रिक्षाचालक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91810 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..