गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मोफत बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मोफत बस
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मोफत बस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मोफत बस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : जिल्ह्यातील कोकणवासीयांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून तब्बल १०० बस मोफत सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. दरम्यान, यंदा कोकणासाठी विशेष ‘मनसे एक्स्प्रेस’ देखील मोफत सोडण्याचा संकल्प अविनाश जाधव यांनी व्‍यक्‍त केला.
गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांसमोर गावी कसे जायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मनसे १०० मोफत बस सोडणार आहे. यासाठी ठाण्यातील गणेशभक्तांना महाड, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, साखरपा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, सावंतवाडी, सुधागड-पाली तसेच पश्चिम महाराष्ट्रात सांगली-सातारा येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध असून, गणेशभक्तांनी मनसे मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
................
मनसे कार्यालयात नोंदणीसाठी झुंबड
मनसेमार्फत कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची नौपाड्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयात अर्ज घेण्यासाठी झुंबड उडत आहे. १२ ते १४ ऑगस्ट रोजी अर्ज स्वीकारण्यात येतील. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठीच ही मोफत बस सेवा उपलब्ध असून, अर्जासोबत प्रवाशांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर तारीख बदलता येणार नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट रोजी बस ठाण्यातून रवाना होतील. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ०२२ - २५३३०४०४ येथे संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91813 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..