जुईनगरमध्ये धुळीचे राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगरमध्ये धुळीचे राज्य
जुईनगरमध्ये धुळीचे राज्य

जुईनगरमध्ये धुळीचे राज्य

sakal_logo
By

जुईनगर, ता. ७ (बातमीदार) ः येथील सेक्टर २५ मधील एका भूखंडावर इमारत उभी करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी या भूखंडामधून गाळ काढण्याचे काम केले जात आहे. मात्र यामुळे जुईनगरमधील रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढले असून त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.
जुईनगर, सेक्टर २५ मधून सानपाडा आणि नेरूळकडे जाण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. तसेच बाजूलाच अमृता विद्यालय असल्याने या रस्त्यावर नेहमीच पालकांची आणि मुलांची वर्दळ असते. अशातच मागील दोन ते तीन दिवसांपासून येथील एका भूखंडातील गाळ काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर चिखलमय झाला आहे. गेले काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यावरील चिखल सुकून गेला आहे; पण खडे आणि माती असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन गेल्याने उडणाऱ्या धुळीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. तसेच या मातीमुळे दुचाकी घसरून पडण्याची शक्यता आहे; पण महानगरपालिकेचे याप्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याबाबत नेरूळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल पत्राद्वारे कळविले आहे. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक दंड करण्याची मागणीदेखील केली आहे.

कोट
रस्त्यावर गाळ पडल्यामुळे संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. मुलांना घेऊन चालताना पडण्याची भीती वाटते. रस्त्यांनी जाताना डोळ्यात धूळ उडते. पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळेच रस्त्यावर गाळ पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
- नयना मिश्री, नागरिक

रस्त्यावरील मातीमुळे स्कुटी चालवताना प्रचंड प्रमाणात भीती वाटते. भूखंडावरील इमारतीचे काम चालू आहे. त्याच व्यक्तींनी रस्ता स्वच्छ केला पाहिजे.
- विद्या भांडेकर, सचिव, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91818 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..