किन्हवलीत डम्‍परच्या धडकेने विजेचे खांब उद्‍ध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किन्हवलीत डम्‍परच्या धडकेने विजेचे खांब उद्‍ध्वस्त
किन्हवलीत डम्‍परच्या धडकेने विजेचे खांब उद्‍ध्वस्त

किन्हवलीत डम्‍परच्या धडकेने विजेचे खांब उद्‍ध्वस्त

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ (बातमीदार) : किन्हवली येथील हनुमान नगरच्या उताराला टाटा कंपनीच्या एका अवजड डम्‍परने रात्री अडीचच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वीजवाहक खांबाला धडक दिल्याने अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथून पनवेल येथे असलेल्या मोदी मोटर्स या शोरूममध्ये वितरणासाठी निघालेल्या टाटा कंपनीच्या एका अवजड डम्‍परला किन्हवली येथील हनुमान नगरच्या उताराला वळणावर रात्री अडीचच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून अपघातात रस्ता सोडून गटाराच्या बाजूला असलेल्या लघु दाबाचे दोन व उच्च दाबाचा एक अशा तीन वीजवाहक खांबाला धडक बसल्याने खांब उद्‍ध्वस्त झाले. खांबांना जोराची धडक बसल्याने अन्य वीजवाहक तारा तुटल्या असून, काही वीजवाहक खांबही वाकल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. वाहनचालक संदीप कुमार यादव सुखरूप आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने वेग कमी झाला; अन्‍यथा भाजप शहर अध्यक्ष राजेश घागस यांच्या घरात हे वाहन घुसून मोठी हानी होण्‍याची शक्‍यता होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91819 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..