गांज्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांज्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद
गांज्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद

गांज्यासह सराईत गुन्हेगार जेरबंद

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ७ (बातमीदार) ः गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरातून शिवाजी नगर पोलिसांनी गांजाच्या साठ्यासह शमीम खान या सराईत गुन्हेगाराला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून एक किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. त्याच्याविरोधात याआधीच्या चार गुन्ह्यांची नोंद शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आहे. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबू बेले हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह शुक्रवारी परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास बैंगनवाडीच्या रोड नं ८ परिसरात शमीम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पंचांसमक्ष त्याच्याकडील पिशवीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गांजा व त्याची पॅकिंग करून विक्री करण्याचे साहित्य सापडले. ते सर्व जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून उपनिरीक्षक बेले अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91842 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..