पालघर जिल्ह्यात साथीच्या आजराबाबत सतर्कता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यात साथीच्या आजराबाबत सतर्कता
पालघर जिल्ह्यात साथीच्या आजराबाबत सतर्कता

पालघर जिल्ह्यात साथीच्या आजराबाबत सतर्कता

sakal_logo
By

बाह्य रुग्ण तपासणीत वाढ : तीन महिन्यांत एक लाख ८० हजार जणांची तपासणी
वसई, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बाह्य रुग्ण तपासणी विभागात रुग्णांची संख्या वाढली असून सर्दी, ताप, खोकला व अन्य साथीच्या रोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून अशा रुग्णांची रक्ततपासणीदेखील केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत एक लाख ८० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण आहेत. या रुग्णांना काही दिवस ताप, खोकला येतो. उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यातील तलासरी तालुका व वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीत एकूण २६ रुग्ण हे स्वाईन फ्ल्यूचेदेखील आढळले. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्ण बरे झाले असले, तरी औषधांचा साठा, उपचार केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच तपासणीवरही जोर दिला जात आहे. मे, जून व जुलै या महिन्यात लाखोंच्या संख्येने बाह्य रुग्ण तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत डेंगीचे ३२ रुग्ण आढळून आले होते; तर चिकनगुनियाचे १, लेप्टोचा १, मलेरियाचे ८ रुग्ण आढळले होते. पावसाळ्यात साथीच्या आजराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून दुर्गम, अतिदुर्गम ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत बाह्यरुग्ण तपासणीच्या सूचना जिल्हा आरोग्य प्रशासनासाकडून देण्यात आल्या आहेत.
------------------------
पावसाळ्यात साथीचे आजार बळावतात; परंतु जिल्हा आरोग्य विभागातील प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या आरोग्य केंद्र, उपकेंद्राला सूचना करण्यात आल्या असून बाह्य रुग्ण तपासणी केली जात आहे. ताप, सर्दी, खोकला याचे रुग्ण असले, तरी ते बरे होत आहेत. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी.
- डॉ. सागर पाटील, अधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग
------------------------
डेंगी
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह
मे - ११६ - ९
जून - ९८ - १४
जुलै - १३१ - ८
एकूण - ३४५- ३२
--------
चिकनगुनिया
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जुलै - ७ - १
-------------–------------------
लेप्टो
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
मे - ३ -१
जून १ - ०
---------
मलेरिया रुग्ण
पॉझिटिव्ह - ८
---------
काय करावे?
आपला परिसर स्वच्छ ठेवा.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास फवारणी करावी.
घरातील पिंप व अन्य भांडी कोरडी ठेवावीत.
बाहेरचे खाणे टाळावे.
पाणी उकळून प्यावे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91863 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..