गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा
गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा

गणेशभक्तांसाठी मोफत बससेवा

sakal_logo
By

कल्याण : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गणपती सणाला काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाविकांची प्रवासासाठी लगबग सुरू होते; मात्र अनेकांना रेल्वे तिकिटासाठी आरक्षण करावे लागते. खासदार एकनाथ शिंदे व शिवसेना कल्याण पूर्व शहराच्या वतीने गणेशभक्तांची समस्या लक्षात घेऊन मोफत एस. टी. बस सुविधा राबवण्यात आहे. यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी ३५० बस सोडण्यात येणार आहे. यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता या बस सुटणार आहेत. भाविकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत नावनोंदणी करावी, असे आवाहन नगरसेविका माधुरी काळे व शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत काळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91870 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..