नेरुळच्या शिवसैनिकांमध्ये धुसफुस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळच्या शिवसैनिकांमध्ये धुसफुस
नेरुळच्या शिवसैनिकांमध्ये धुसफुस

नेरुळच्या शिवसैनिकांमध्ये धुसफुस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः शिंदे गटाला भेटून आल्याच्या रागात नेरूळ येथील शिवसैनिकांनी माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या गाळ्यात सुरू असणारी शिवसेनेची शाखा बंद केली. ही शाखा बंद करून औटी यांच्या गाळ्याच्या शेजारी दुसऱ्या गाळ्यात शाखा क्रमांक ८४ सुरू करण्याची तयारी शिवसैनिकांकडून सुरू आहे; परंतु आपल्या गाळ्यात शाखा सुरू असून नेत्यांचे जुने फोटो काढण्यासाठी काही दिवसांसाठी शाखा बंद असल्याचे स्पष्टीकरण रंगनाथ औटी यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर नवी मुंबईतील शिवसेनेतही दोन गट पडले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीतील विजयाची गणिते जोडून शिवसेनेतील माजी नगरसेवक इकडून तिकडे उड्या घेत आहेत. यादरम्यान रंगनाथ औटी यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती; परंतु त्यांनी घेतलेली भेट जुन्या शिवसैनिकांना पटली नाही. औटीच्या या भेटीविरोधात नेरूळ-जुईनगरमधील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले. त्यानंतर औटी यांनी आपण शिंदे गटाचे समर्थक नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र औटी यांच्या पक्ष बदलण्याच्या स्वभावामुळे नेरूळच्या शिवसैनिकांना विश्वास बसत नसल्याने अखेर काही दिवसांपूर्वीच औटी यांच्या कार्यालयात सुरू असलेली नेरूळ शाखा क्रमांक ८४ बंद केली. तसेच शाखाप्रमुख राजू पुजारी यांच्या खासगी कार्यालयात शाखा सुरू करण्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका पदाधिकाऱ्याने दिली. नेरूळ येथील या प्रकरणामुळे शिंदे गटाला भेटून आलेले आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असणाऱ्या माजी नगरसेवकांवर शिवसैनिकांकडून शंका घेतली जात असल्याचे उघड झाले आहे.
----------------------------
मी कालही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, आजही त्यांच्यासोबत आहे आणि यापुढे भविष्यातही राहणार आहे. माझ्या कार्यालयात आजही शिवसेनेची शाखा सुरू आहे. फक्त शिवसेना सोडून गेलेले नेते एकनाथ शिंदे, विजय चौगुले आणि विजय नाहटा यांचे फोटो काढून नवीन फोटो लावलेले बॅनर लावण्यासाठी शाखा काही दिवसांसाठी बंद केली होती. उद्या सकाळपासून माझ्या कार्यालयात शिवसेना शाखा क्रमांक ८४ सुरू होईल.
- रंगनाथ औटी, माजी नगरसेवक, शिवसेना
-------------------------
माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेरूळ आणि नवी मुंबईतील इतर शिवसैनिक सहभागी झाले होते.
नेरूळ शाखा क्रमांक ८४ मधील शिवसैनिकांमध्ये कसलेही वाद नाहीत. आम्ही सर्व एकत्र आहोत. औटी यांच्या कार्यालयाचा करार संपल्यामुळे शाखा बंद केली होती. दुसरे काहीही वादाचे कारण नाही.
- विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91882 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..