एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प
एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प

एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प

sakal_logo
By

फोटो परेल ग्रुप मध्ये आहे.
----------
एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी ठप्प
नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या चकरा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः राज्य शासनाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या सुमारे २९ सेवांची स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू आहे. त्यामध्ये सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी केली जात आहे. मात्र वेळोवेळी मुदतवाढ देऊनही अद्याप नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. सध्या दोन महिन्यांची मुदतवाढ देऊनही एसटीची नोंदणी यंत्रणाच ठप्प झाली आहे. मुंबई सेंट्रल आगाराच्या तिकीट खिडकीवर आधार लिंक सर्व्हर बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.

एसटीचा प्रवास करायचा असल्यास भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रचलित पद्धतीनुसार सवलत दिली जाणार नसून, स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या राज्यभरात सुमारे २० टक्क्यांहून अधिक आहे. त्यासाठी ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक एसटीच्या सवलतीसाठी पात्र आहेत. त्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यास त्यांना ५० टक्के तिकीटदरात प्रवासाचा लाभ मिळणार आहे. मात्र, कोरोना आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुरुवातीला स्मार्ट कार्ड नोंदणी रखडली होती. त्यानंतर आता विविध तांत्रिक कारणांमुळे नोंदणी रखडल्याचे दिसून येत आहे.

गेल्या एक महिन्यापासून मुंबई सेंट्रल आगारासह मुंबई विभागातील इतरही आगारांतील नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. आधार लिंक सर्व्हर बंद असल्याचे कारण दिले जात असून, प्रत्यक्षात स्मार्ट कार्ड नोंदणी करणाऱ्या कंपनीचे कंत्राट संपले. त्यानंतरही अद्याप नवीन कंत्राटदार नेमण्यात आले नसल्याने स्मार्ट कार्ड नोंदणी रखडल्याचे उघड झाले आहे.
----
कोट
काही तांत्रिक कारणांमुळे नोंदणी थांबली आहे. स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही प्रक्रिया येत्या सोमवारपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.
- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, वाहतूक एसटी महामंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91885 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..