अज्ञात व्यक्तींकडून फ्रेंड रिक्वेस्ट टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात व्यक्तींकडून फ्रेंड रिक्वेस्ट टाळा
अज्ञात व्यक्तींकडून फ्रेंड रिक्वेस्ट टाळा

अज्ञात व्यक्तींकडून फ्रेंड रिक्वेस्ट टाळा

sakal_logo
By

अज्ञात व्यक्तींकडून फ्रेंड रिक्वेस्ट टाळा!

सायबर विभागाकडून नागरिकांना आवाहन
वीज बिल भरणे, कर्ज, पोलिस असल्याचे फसवे फोन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना ऑनलार्इन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. व्हिडीओ कॉल्स, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट, अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नका, असा सल्ला सायबर विभागाने दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.
राज्य सायबर विभागाकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. ज्यात वीज बिलांच्या बहाण्याने कर्ज अॅप्स आणि ऑनलार्इन मार्केटप्लेसद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. तसेच आक्षेपार्ह अश्लील हालचाली महिला व्हिडीओ कॉलमध्ये करत असून नंतर ब्लॅकमेल करून फसवणूक झाल्याची तक्रार, तसेच सायबर पोलिस अधिकारी म्हणून खोटे सांगून नागरिकांकडून पैसे उकळल्याच्या घटना घडल्या आहेत.

वीज बिल भरण्याच्या नावे फसवणूक
राज्याच्या सायबर विभागाकडे सुमारे ४०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये फसवे कॉलर्स वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगून धमकावत आहेत. अशा कॉलर्ससोबत कोणताही व्यवहार करण्यापूर्वी लोकांनी वीज कंपनीच्या ग्राहक सेवा कक्षाशी संपर्क साधावा, त्यांचे वीज मीटर तपासावे किंवा कंपनीने आपल्या वतीने कॉल करण्यासाठी कोणाला काम दिले आहे का ते विचारावे, असे सायबर विभागाने कळवले आहे.

कोणत्याही गोष्टीसाठी ऑनलार्इन खरेदी करण्यापूर्वी किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. लोकांनी अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल स्वीकारू नये. जर त्यांना पुन्हा कॉल आला तर त्यांनी तो नंबर ब्लॉक करावा किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी. तसेच नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. अशा बहुतांश घटनांमध्ये फसवणूक करणारे महिलांची छायाचित्रे वापरतात, लोकांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

चौकट
लोन ॲप्सद्वारे फसवणूक
लोन अॅप्सच्या एजंट्सकडून होणाऱ्या छळामुळे लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. सायबर विभागाकडे फसवणुकीच्या सुमारे २०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यात फसवणूक करणारे ऑनलार्इन मार्केटप्लेसचे प्रतिनिधी म्हणून विविध उत्पादनांची खरेदी-विक्रीची ऑफर देतात. अशा वेळी नागरिकांनी ऑनलार्इन पैसे भरू नयेत. त्यांनी खरेदीदार/ विक्रेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे आणि रोख रक्कम द्यावी, असेही सायबर विभागाने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91892 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..