तरुणांनी बुजवले घोळ-धामटणे रस्त्यावरील खड्डे तरुणांनी स्वतः केली मेहनत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी बुजवले घोळ-धामटणे रस्त्यावरील खड्डे
तरुणांनी स्वतः केली मेहनत
तरुणांनी बुजवले घोळ-धामटणे रस्त्यावरील खड्डे तरुणांनी स्वतः केली मेहनत

तरुणांनी बुजवले घोळ-धामटणे रस्त्यावरील खड्डे तरुणांनी स्वतः केली मेहनत

sakal_logo
By

कासा, ता. ७ (बातमीदार) : जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुख्य रस्ते व गाव-पाड्यांतील रस्त्यांची या पावसात दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. अशी परिस्थिती जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत आहे. डहाणू तालुक्यातील घोळ-धामटणे ते पेठ नानिवली ते पुढे बोईसर शहराला जोडणाऱ्या धामटणे-घोळ या मुख्य रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यावर जवळपास तीन किलोमीटरपर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. जिल्ह्यातील नागझरी, लालोंडे, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हाण, नानिवली व डहाणू तालुक्यांतील कासा, घोळ, धामटणे, पेठ आदी गावांतील नागरिक व शाळकरी विद्यार्थी, कॉलेजसाठी तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्रात कामासाठी या रस्त्यावरून दररोज जीवघेणा प्रवास करत आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी भरल्याने अनेक दुचाकीस्वारांचा पडून अपघात झाला आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला असून धामटणे गावातील नीलेश कासट आणि चंद्रकांत घरत यांनी श्रमदान करत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91894 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..