आगीत मासेमारी जाळी जळून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगीत मासेमारी जाळी जळून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान
आगीत मासेमारी जाळी जळून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान

आगीत मासेमारी जाळी जळून सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : अर्नाळा येथे मच्छीमारांना जाळी विणणे, मासे सुकविणे इत्यादी कामांसाठी शासनाने जागा राखून ठेवली असून तेथे मच्छीमारांना जाळी विणण्यासाठी शेड शासनाने बांधली आहे. या शेडमध्ये ठेवलेल्या जाळ्यांना रविवारी पहाटे ३.३० वाजता आग लागली. या वेळी एसटी पाडा येथील रहिवाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग विझत नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलालाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली; परतुं या आगीत एकूण ११ जाळ्या जळून भस्मसात झाल्या. यंदाचा नवीन मासेमारी हंगाम आता चालू झाला असून या घटनेने मदर मेरी बोटीचे मालक राजेश डेडू यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पहाटे उपसरपंच महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अर्नाळा सागरी पोलिस ठाणे येथेदेखील घटनेची माहिती देऊन तक्रार दाखल करण्यात आली. या वेळी अर्नाळा फिशेरमेन्स संस्थेचे अध्यक्ष विल्सन जमन, अर्नाळा मच्छीमार संस्थेचे नागेश भुरकी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91902 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..