परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर गंभीर त्रुटी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः राज्य परिवहन विभागातील फेसलेस ऑनलाईन सेवांचा राज्यभरात गैरवापर सुरू असल्याचे उघड झाले आहे. जळगाव येथील आमदारांचे वाहन परस्पर दुसऱ्यांच्या नावावर केल्याची घटना असो, नंदुरबार, बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत बीएस ४ वाहनांच्या बॅकलॉग नोंदणीचे प्रकरण असो की कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील वाहनांच्या संदर्भात घडलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन घटना असो. यामुळे एनआयसीच्या ऑनलाईन सेवांमध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे उघड झाले आहे.

विविध ऑनलाईन सेवांमध्ये वापरला जाणार ओटीपी क्रमांक इतर वेळी ३० सेकंदानंतर कालबाह्य होतो. मात्र, परिवहन विभागात वाहन, सारथीच्या संकेतस्थळावर जनरेट होणाऱ्या ओटीपीसाठी तब्बल १२ तासांची कालमर्यादा राहत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दिवसभरात कितीही वेळा लॉगिन केले, तरी ओटीपी मात्र सारखाच आहे. त्यामुळे अनेकदा बेकायदा काम करणे सोपे होऊ शकते, असे कर्मचारीच खासगीत बोलताना सांगत आहेत.
--------
हे बदल आवश्यक
- ओटीपी कालावधी १२ तासांऐवजी ३० सेकंदपर्यंत वैध असावा.
- एनआयसीने जारी केलेले कवच नावाचे अॅप्लिकेशन प्राधिकृत करावे.
- बॅकलॉग एन्ट्री हे कार्यालयाच्या स्तरावरच होणे गरजेचे आहे.
- जुन्या वाहनाची बॅकलॉग एन्ट्री घेण्यासाठी फेसलेस सेवेमध्ये सुविधा देण्यात येऊ नये.
- केवळ आधार लिंक मोबाईलवर फेसलेस सुविधा उपलब्ध व्हावी.
- वाहन ४.० तसेच बॅकलॉग प्रणालीची साईट फक्त कार्यालयीन किंवा अधिकृत आयपी अॅड्रेसच्या संगणक, लॅपटॉप, मोबाईलवर कार्यान्वित व्हावी.
- प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा.
- संपलेल्या सीरिजमधील शिल्लक क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये दिसू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91904 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..