पक्षप्रमुखांचे हात बळकट करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षप्रमुखांचे हात बळकट करणार
पक्षप्रमुखांचे हात बळकट करणार

पक्षप्रमुखांचे हात बळकट करणार

sakal_logo
By

विरार, ता. ९ (बातमीदार) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी स्थानिक गटबाजी संपवून वसई, विरार शहरात संघटना अधिकाधिक मजबूत करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती झाल्यानंतर नालासोपारा-वसई विधानसभा क्षेत्रातील पहिलीच सभा वसई येथील नवघर-माणिकपूर शिवसेना शाखेत बुधवारी आयोजित करण्यात आली होती.

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अडचणी, समस्या आणि सूचना जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन व आगामी महापालिका निवडणूक कामाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर आपली मते आणि विचार व्यक्त केले. शिवसेनेतील स्थानिक गटबाजी संपवण्याचा निर्धार सर्वांनी एकमताने केला. पक्ष संघटना वाढीकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना लागेल ते सहकार्य करण्यावर या वेळी एकमत झाले.

आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने आतापासून कामाला लागण्याबाबत या सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले. नालासोपारा-वसई विधानसभा जिल्हाप्रमुखपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या सभेला माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, विनायक निकम, जितू शिंदे, युवा सेना शहरप्रमुख धनंजय मोहिते, महिला आघाडीच्या भक्ती दांडेकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91919 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..