आजीबाईची ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी राख्यां निर्मितीतून जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजीबाईची ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी राख्यां निर्मितीतून जनजागृती
आजीबाईची ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी राख्यां निर्मितीतून जनजागृती

आजीबाईची ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेसाठी राख्यां निर्मितीतून जनजागृती

sakal_logo
By

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील फांगणे गावातील जगप्रसिद्ध आजीबाईंच्या शाळेतील आजीबाईंनी देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या शासकीय उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी राख्यांची निर्मिती केली आहे. ८ मार्च २०१६ रोजी ‘जागतिक महिला दिना’च्या दिवशी स्थापन झालेल्या या शाळेला सर्वप्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्धी दिली होती, त्याची दखल घेऊन इतर वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल यांनी देश विदेशात या शाळेला प्रसिध्दी दिली.
जनजागृती करणाऱ्या राख्या बनवणारी आजीबाईंची शाळा ही एकमेव शाळा ठरली आहे. वयस्क आजीबाईंना शिक्षण देणारी आजीबाईंची शाळा ही जगातील पहिली व एकमेव शाळा मुरबाड तालुक्यातील टोकावडे भागातील दुर्गम फांगणे या गावात आहे. ६० ते ९४ वयाच्या ३० आजीबाई आपल्या उतारवयात शिक्षणाचे धडे शाळेत गिरवत आहेत. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, या वाक्याला सत्यात आणण्याचे काम या आजीबाईंनी जिद्द, कष्ट, त्याग याद्वारे अधोरेखित केले आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, अशा देशातील परदेशी पाहुणे या शाळेत येऊन गेले आहेत. तसेच जगप्रसिद्ध ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शाळेची नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शाळेसाठी दिलीप दलाल, शिक्षिका शितल मोरे यांनी मेहनत घेतली आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेला व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्याचे काम ‘सकाळ’मधून करण्यात आले.

--------------
कैलासवासी मोतीराम गणपत दलाल ग्रुप संचालित आजीबाई शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ हा संदेश राख्यांद्वारे सर्वदूर पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभक्तीपर अशा या उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा, अशी आजीबाईंची भावना आहे.

- योगेंद्र बांगर, शाळा संस्थापक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g91943 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..