आमदार दिलीप लांडे यांनी राबविले ‘घरोघरी तिरंगा’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार दिलीप लांडे यांनी राबविले ‘घरोघरी तिरंगा’ अभियान
आमदार दिलीप लांडे यांनी राबविले ‘घरोघरी तिरंगा’ अभियान

आमदार दिलीप लांडे यांनी राबविले ‘घरोघरी तिरंगा’ अभियान

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांनी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान सुरू केले. प्रत्येक मुंबईकराने अभिमानाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा म्हणून पालिकेतर्फे घरोघरी तिरंगावाटप सुरू आहे. पालिका एल विभागातर्फे चांदिवली विभागात आमदार दिलीप (मामा) लांडे, पालिका अधिकारी दुय्यम अभियंता मंगेश पालवे, कनिष्ठ अभियंता दत्ता पाटील स्थानिक समाजसेवक आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र मिळून काजुपाडा, कुर्ला (प) विभागात भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे वाटप केले. याचबरोबर हा तिरंगा कसा फडकवावा, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करीत तसे पत्रकही देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92087 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..