छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुविधा पुरवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुविधा पुरवा
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुविधा पुरवा

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुविधा पुरवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दिवसेंदिवस उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची वाढत आहे. अशातच रुग्णांना उपचार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यात रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना सोयीसुविधा पुरविण्यात अपयश येत आहे. त्यामुळे तिरंगा घरोघर वाटप करण्याऐवजी त्याचा पैसा रुग्णालयासाठी वापरा, रुग्णालयात कर्मचारी भरती करावी, अशी मागणी मनसेचे निखिल जाधव यांनी प्रशासनाकडे केली.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर, त्याचा ताण पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येत आहे. सिव्हिल हॉस्पिटल बंद असल्याच्या कारणाने सर्व पेशंट या रुग्णालयात येत असल्याने रुग्णांना बेड उपलब्ध नाही. रुग्णालयात एका वॉर्डमध्ये दोन परिचारिका व एक वॉर्ड बॉयवर शंभर रुग्णांची जबाबदारी आहे. याचा ताण येथील स्टाफवर येत आहे. त्यामुळे परिचारिका रागाने बोलतात, अशा तक्रारी येतात. जर एकाच व्यक्तीला सारखंसारखं काम करायला लावले तर चिडचिड होणे हे साहजिक आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना, तिरंगा घरोघर वाटप करण्याचे राहू द्या, त्याचा पैसा रुग्णालयासाठी वापरा, रुग्णालयातील कर्मचारीची भरती करावी. तसेच आधुनिक यंत्रसामुग्री व औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी मनसेचे निखिल जाधव यांनी ठाणे पालिकेच्या आयुक्तांकडे केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92096 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..