विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे

विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे

sakal_logo
By

कल्याण, ता. ९ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कल्याण पूर्व वाहतूक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून विविध शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्यात आले. कल्याण पूर्वमध्ये वाहतूक पोलिस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाचे अनुषंगाने आय.डी.एल. इंग्लिश स्कूल, आय.सी.ई. हायस्कूल, विश्वास विद्यालय काटेमानिवली, सम्राट अशोक हायस्कूल विजयनगर, नूतन ज्ञानमंदिर कल्याण पूर्व व कमलादेवी महाविद्यालय विठ्ठलवाडी कल्याण पूर्व या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहीती दिली वाहतूक कोंडी व्यवस्थापन याबाबत जनजागृती केली. नवीन दंडाबाबत माहिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अपघातास कारणीभूत असलेल्या ८ हेड बाबत मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुखाध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92099 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..