धबधब्यावर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धबधब्यावर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका
धबधब्यावर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका

धबधब्यावर अडकलेल्या चार पर्यटकांची सुटका

sakal_logo
By

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या थीतबी गावा जवळील काळु धबधब्यावर अडकलेल्या पुणे येथील चार पर्यटकांना स्थानिक आदिवासी तरुण, वन विभागाचे कर्मचारी व गिर्यारोहकांनी संयुक्त मोहीम राबवून सुखरूप बाहेर काढले.
पुणे येथे राहणा-या पाच तरुणांचा एक गट सोशल मीडियाच्या माध्यमतून व्हिडिओ पाहून रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काळु धबधब्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. संध्याकाळी अचानक काळु धबधब्यातील नदीला पाणी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या पाच पैकी चार जण नदीच्या पात्रात अडकले. त्यांच्यापैकी एका व्यक्तीच्या नातेवाईकाने आमदार किसन कथोरे यांना फोन करुन मदत करण्यास विनंती केली. त्यांनी मुरबाड पंचायत समिती सदस्य अनिल घरत यांना फोन करुन सदर व्यक्तींना मदत करण्यास कळविले. घरत यांनी समयसूचकता दाखवत थितबी येथील माजी सरपंच बाळू कोरडे, पोलिस पाटील बाळू गारे व ग्रामस्थांना घटनास्थळी पाठवले. त्यांच्यासोबत वनरक्षक जयश्री भला, एकनाथ वाघ, गणपत मुठे व हंगामी वनमजूर भगवान खाकर, प्रभाकर मुठे हे होते.

दोन तरुणांनी धबधबा ट्रेक करत गाठले पर्यटकांचे ठिकाण
---
चारही पर्यटकांना नदीच्या पात्रातून दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडकलेल्या पर्यटकांना नदी पार करणे जमत नव्हते. रात्री ११ वाजता थितबी येथील मोहन गारे व युवराज गारे या दोन तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काळू धबधबा ट्रेक करत अडकलेल्या पर्यटकांचे ठिकाण गाठले. तेथून त्यांना वाघेवाडी मार्गे सुरक्षितपणे घेऊन येऊन रात्री २ वाजता त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92100 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..