जोगेश्वरीतील विद्यार्थी जवानांना शुभेच्‍छापत्र पाठवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्वरीतील विद्यार्थी जवानांना शुभेच्‍छापत्र पाठवणार
जोगेश्वरीतील विद्यार्थी जवानांना शुभेच्‍छापत्र पाठवणार

जोगेश्वरीतील विद्यार्थी जवानांना शुभेच्‍छापत्र पाठवणार

sakal_logo
By

मालाड, ता. ९ (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सीमेवरील सैनिकांबद्दल आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जोगेश्वरीतील विविध शाळांतील विद्यार्थी शुभेच्‍छापत्र पाठवणार आहेत. यामध्‍ये बांद्रेकरवाडी समर्थ शाळेचे मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर, बालविकास आरजेएमडी शाळेच्या सचिव सुरक्षा घोसाळकर यांच्या मदतीने व चैतन्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेला. ही शुभेच्‍छापत्रे नॉर्थ ईस्टच्या १०६ मीडियम रेजिमेंटला पाठविण्यात येणार आहेत. जोगेश्वरीतील समर्थ विद्यालय, बालविकास शाळा, जीवन विकास केंद्र, अण्णा भाऊ साठे स्मारक आदी संस्था व शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी शाळांचा समन्‍मय करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यापूर्वी साधारण आठशे शुभेच्छापत्र आदिवासी पाड्यातील मुलांकडून तयार करून घेऊन ती पाठविण्यात आली होती, अशी माहिती उपक्रमप्रमुख सविता दोंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92104 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..