आत्मसम्मान मंचच्या शंखनादाचा प्रभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मसम्मान मंचच्या शंखनादाचा प्रभाव
आत्मसम्मान मंचच्या शंखनादाचा प्रभाव

आत्मसम्मान मंचच्या शंखनादाचा प्रभाव

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः आत्मसम्मान मंच संस्थेच्या प्रयत्नांमुळे घाटकोपर पूर्वेला असलेल्या विद्या भवन शाळेबाहेरील खड्डे बुजवण्यात यश आले आहे. संस्थेच्या वतीने अनिल शर्मा यांनी शाळेबाहेरील खड्ड्यांसमोर शंख वाजवून हा विषय पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्‍यामुळे खड्डे बुजवले गेले आहेत.
विद्या भवन शाळेबाहेर खड्डे असल्याने शाळकरी मुले व आजूबाजूला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा अपघातही होत होते. खड्डे बुजवल्यानंतर आत्मसम्मान मंचचे अध्यक्ष नित्यानंद शर्मा म्हणाले, की अनेक पालकांसाठी शाळेबाहेरील खड्डे भरले याचा आम्हाला आनंद आहे. आभाराचे फोन येत आहेत, खड्ड्यांच्या तक्रारीनंतर आमच्या टीमने जाऊन पुन्‍हा शंखनाद केला.
विशेष म्हणजे मुंबई आणि परिसरात जिथे जिथे खड्ड्यांची बातमी येते तिथे आत्मसम्मान मंचची टीम तिथे जाऊन शंख करून खड्ड्यांची समस्या सोडवते, याआधी अंधेरी, जुहू, घाटकोपर परिसरात खड्ड्यांची समस्या होती. शंख वाजवून याच प्रकारे आमच्या टीमने मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यश मिळवले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92105 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..