राज्‍यातील सरकारी शाळांमध्ये इंटनेटची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्‍यातील सरकारी शाळांमध्ये इंटनेटची वानवा
राज्‍यातील सरकारी शाळांमध्ये इंटनेटची वानवा

राज्‍यातील सरकारी शाळांमध्ये इंटनेटची वानवा

sakal_logo
By

राज्‍यातील सरकारी शाळांमध्ये इंटरनेटची वानवा
डिजिटल इंडियाची घोषणा कागदावरच

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्यात शालेय शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्तेवर अनेकदा टीका होत असतानाच सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी शाळा अद्यापही इंटरनेट आणि त्याच्या जोडणीपासून कोसों दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मुंबई महापालिका शाळांचा अपवाद वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत इंटरनेटसंदर्भात खूपच निराशाजनक चित्र समोर आले आहे.
लोकसभेत खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, भावना गवळी आदींनी नुकताच राज्यातील सरकारी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा किती प्रमाणात उपलब्ध आहे यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लेखी माहिती दिली आहे. अन्नपूर्णा देवी आपल्या उत्तरात म्हणतात, महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएनएल सरकारी संस्था पुढे आली आहे. त्या माध्यमातून एफटीटीएच (फाइबर टू होम) कनेक्शन जोडून दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित राज्यांनी बीएसएनएलसोबत करार करून इंटरनेटचे कनेक्शन घ्यावे, यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अन्नपूर्णा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पालिका शाळांमध्ये इंटरनेट सुविधा समाधानकारक असली तरी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर अजूनही उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यात उपराजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्याची सर्वांत दयनीय अवस्था समोर आली असून केवळ २.९९ टक्के शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. त्या तुलनेत विदर्भातील यवतमाळ ४.२६, वर्धा ४.५१, हिंगोली ७.५५ आणि गोंदिया जिल्ह्यांतील ६.७४ टक्के शाळांमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे.
मुंबई शहरातील शाळांमध्ये १०० टक्के इंटरनेटची सोय आहे. त्यानंतर राज्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असून तिथे ३३.३७ टक्के शाळांमध्ये सोय आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात १८.५९ टक्के इंटरनेटची सोय आहे.
इंटरनेटची सेवा शाळांमध्ये सुरू करण्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे अत्यंत मागे राहिले आहेत. त्यात नगर जिल्ह्याची १७.७७ टक्के, सांगली ८.७६, सातारा ८.०७ आणि कोल्हापूर ५.८९ टक्के अशी चिंताजनक स्थिती आहे. मराठवाड्यातील बीड ९.३४, नांदेड १२.७६, लातूर ७.५०, परभणी १४.१५ आणि आताच्या संभाजीनगर जिल्ह्यातील ६.६६ टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.

इंटरनेट असलेल्या आघाडीच्या शाळा
मुंबई शहर ः १०० टक्के
मुंबई उपनगर ः ८१.१५ टक्के
जळगाव ः ३३.३७ टक्के
सोलापूर ः २८.१३ टक्के
पुणे ः १८.५९ टक्के
सिंधुदुर्ग ः २८.१३ टक्के

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92109 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..