महिला बालकल्याण विभागाच्या दहा वर्षांच्या कामांची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बालकल्याण विभागाच्या दहा वर्षांच्या कामांची चौकशी
महिला बालकल्याण विभागाच्या दहा वर्षांच्या कामांची चौकशी

महिला बालकल्याण विभागाच्या दहा वर्षांच्या कामांची चौकशी

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून याआधी करण्यात आला होता. याच विषयावरून गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत गदारोळही झाला होता. आता काँग्रेसने केलेल्या आरोपांवरून आयुक्त दिलीप ढोले यांनी या विभागात गेल्या १० वर्षांत झालेल्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत दरवर्षी महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यात महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. हे प्रशिक्षण देण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाते; मात्र प्रशिक्षणातच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दीप काकडे यांनी केला होता व त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. याच मागणीला अनुसरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत प्रेक्षागृहात भ्रष्टाचार विरोधातील फलक झळकावले होते. त्यामुळे महासभेत मोठा गदारोळ झाला होता. यावर संतप्त झालेल्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तीन लाख रुपयांची मागणी केली होती व ती पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन केले असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत व दीप काकडे यांच्यासह १२ जणांविरोधात भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.
...
आरोपांच्या पार्श्वभूमीवर...
महासभेत झालेल्या आंदोलनाची तसेच महापौरांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांची दखल घेऊन काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी महिला, बालकल्याण विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. या विभागातील गेल्या १० वर्षांच्या कामकाजाच्या कागदपत्रांची प्रभारी मुख्य लेखापरीक्षकांनी महापालिकेत सेवा पद्धतीने नेमलेल्या लेखापरीक्षकांकडून परीक्षण करून घ्यावे व त्याचा वस्तुस्थितीदर्शक व स्वयंस्पष्ट अहवाल बंद लिफाफ्यात लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92120 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..