विजेचा खांब कोसळून दुचाकीस्‍वार गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेचा खांब कोसळून दुचाकीस्‍वार गंभीर
विजेचा खांब कोसळून दुचाकीस्‍वार गंभीर

विजेचा खांब कोसळून दुचाकीस्‍वार गंभीर

sakal_logo
By

बोईसर, ता. ९ (बातमीदार) : बोईसर तारापूर-औद्योगिक वसाहतीत कोलवडे नाका येथे महावितरणचा लोखंडी खांब मुख्य रस्त्यात योगेश कांतिलाल पागधरे, रा. नवापूर यांच्या अंगावर पडून ते जबर जखमी झाले. त्‍यांना तातडीने तुंगा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले.
कोळवडे येथे चार-पाच वर्षांपूर्वी विद्युत तारा तुटून सहा म्हशी दगावल्‍या होत्‍या. कोळवडे भागासाठी हे संकट नवीन नाही. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये वारंवार होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. धोकादायक विजेचे खांब बदललेले असते, तर ही दुर्घटना घडली नसती. याप्रकरणी दोषी अधिकारीवर्गावर कारवाई करून दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्‍या व्यक्तीचा वैद्यकीय खर्च महावितरण विभागाने करावा, अशी मागणी होत आहे.

-------------------------------
कोट
मान्सूनपूर्व दुरुस्‍तीचे काम झाले होते; परंतु वादळी वाऱ्याचा जोर असल्‍याने खांब कोसळला. जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी मदत करणार आहोत.
- लक्ष्मण राठोड, उपकार्यकारी अभियंता, औद्योगिक महावितरण उपविभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92130 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..