पादचारी पुलावर दुर्गंधीचे बस्ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पादचारी पुलावर दुर्गंधीचे बस्ताण
पादचारी पुलावर दुर्गंधीचे बस्ताण

पादचारी पुलावर दुर्गंधीचे बस्ताण

sakal_logo
By

तुर्भे, ता. १० (बातमीदार) : तुटलेल्या पायऱ्या, जागोजागी पानाच्या पिचकाऱ्या, साचलेले पाणी, कचऱ्याचा ढीग, धोकादायक स्थितीतील जाळ्या, वारंवार बंद पडणारी लिफ्ट अशी अवस्था तुर्भे नाका येथील जुन्या व नव्या पादचारी पुलाची झाली आहे. त्यामुळे सुविधा असूनही परिसरातील नागरिक वर्दळीच्या ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करत आहेत.
नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांनी पदपथही सोडले नसल्याने पादचाऱ्यांच्या सोयीसाठी शहरात स्कायवॉकची संकल्पना राबविण्यात आली आहे, पण या पादचारी पुलांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने गैरसोयींचे ठिकाण ठरत आहे. तुर्भे नाका येथील नवीन आणि जुन्या पादचारी पुलासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, पण सध्या देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे पुलांची दुरवस्था झाली आहे. या पुलावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून दारूच्या बाटल्या, पायऱ्यांवर साचलेले पाणी आणि धुळीचे परसरलेल्या साम्राज्यामुळे पुलावरून चालणेही पादचाऱ्यांना कठीण झाले आहे. याबाबत तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

कोट्यवधींचा खर्च वाया
तुर्भे नाका येथून जनता मार्केटला जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा जीवघेणा प्रकार अनेकांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्थानिकांनी पादचारी पुलासाठी रेल रोको केला होता. त्यानंतर मनपाने तब्बल सहा कोटी ८४ लाख खर्च करून हा पादचारी पूल उभारला आहे. मात्र सध्या पुलाची देखभाल-दुरुस्तीसोबत स्वच्छता होत नसल्याने दुरवस्था झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92133 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..