‘पाताचं पाणी’ला अखेर मिळाले पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाताचं पाणी’ला अखेर मिळाले पाणी
‘पाताचं पाणी’ला अखेर मिळाले पाणी

‘पाताचं पाणी’ला अखेर मिळाले पाणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीच्या नॅशनल पार्क मधील ‘पाताचं पाणी’ या आदिवासी पाड्याला स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी पिण्याचे पाणी मिळाले आहे. त्‍यामुळे येथील रहिवाशांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.
कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज या श्रीमंत वस्तीच्या शेजारी असलेला हा आदिवासी पाडा वनविभागात येत असल्याने तेथील नागरिकांना मूलभूत सोयींपासून वंचित राहावे लागते. ठाकूर व्हिलेज तसेच शेजारच्या झोपडपट्ट्यांना पाणी, वीज, स्वच्छतागृहे, मोफत घरे अशा हव्या त्या सुविधा उपलब्ध असताना या आदिवासी पाड्यांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे तेथील नागरिकांसमोर पाणीमाफियांना शरण जाणे किंवा पाण्याच्या शोधात भटकंती करणे हे दोनच पर्याय होते. सकाळ टुडेनेदेखील हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता. या पाड्यावर असलेली एक बंद निकामी बोअरवेल पुन्हा सुरू करून येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम भाजपचे देवांग दवे यांनी केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नुकतेच तेथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोअरवेल पंपाचे उद्‍घाटन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92143 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..