पारंपरिक वेशभूषेत आदिवासी तरुणांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक वेशभूषेत आदिवासी तरुणांचा सहभाग
पारंपरिक वेशभूषेत आदिवासी तरुणांचा सहभाग

पारंपरिक वेशभूषेत आदिवासी तरुणांचा सहभाग

sakal_logo
By

मनोर, ता. ९ (बातमीदार) : मनोर परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहिसरतर्फे मनोर, ढेकाळे आणि बोट गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावी मोटारसायकल रॅली आणि आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वतीने मनोर गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढेकाळे गावात मिरवणूक काढण्यात आली होती. गांजे गावातून निघालेली मिरवणूक ढेकाळे नाक्यावर पोहोचल्यानंतर डीजेच्या तालावर ग्रामस्थ आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांनी तारपा नाच केला.

चिल्हार फाटा येथे ग्रामस्थ आणि श्रमजीवी संघटनेच्या वतीने राघोबा भांगरे चौकाचे नूतनीकरण करण्यात आले. या वेळी तारपा नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावरे एम्बुर, टेन, टाकवाहाल, सावरखंड, पोळे नवी दापचरी गावांच्या तरुणांना एकत्र येत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप मस्तान नाका येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आला. मनोर गावातील रॅलीत मनोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप कसबे, माजी सरपंच पौर्णिमा दातेला, श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार, किसन भूयाल, दामोदर कासट उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92147 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..